Dindori Lok Sabha : नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात 1,03,632 मतं घेणारे अपक्ष उमेदवार गायब? कुटुंबीय पोलिसात तक्रार देणार

Dindori Lok Sabha : दिंडोरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाबू भगरे गायब झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कुटुंब चिंतेत असून पोलिसात तक्रात देणार असल्याचं त्यांच्या मुलाने म्हटलं आहे.
Dindori Lok Sabha
Dindori Lok SabhaSaam Digital
Published On

तबरेज शेख

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही मतदारसंघात नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्यात आले होते. नाशिकमधील दिंडोरीतही भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. १ लाखाहून अधिक त्यांना मतं मिळाली होती. मात्र निकालानंतर ते अचानक गायब झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्यानं कुटुंब चिंतेत असून पोलिसात तक्रात देणार असल्याचं त्यांच्या मुलाने म्हटलं आहे.

नाशिकमधील गंगावाडी गावातील रहिवाशी बाबू भगरे तिसरी पास आहेत. मोलमजुरी आणि मासेमारी करतात तरीही त्यांच्यानावापुढे सर म्हणून उल्लेख होता. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघातील विजयी उमेदवार भास्कर भगरे शिक्षक असूनही त्यांच्या नावासमोर सर उल्लेख नव्हता. बाबू भगरे यांची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत असून सायंकाळपर्यंत घरी आले नाहीत तर नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांच्या मुलाने म्हटलं आहे.

Dindori Lok Sabha
Sushma Andhare News: देवेंद्र फडणवीस का होतायेत जबाबदारीतून मुक्त? कोणाचं होणार कमबॅक? सुषमा अंधारेंनी थेट नावचं सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com