

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील शिंदे-भाजप युती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांची रवानगी दिल्लीत केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा फेरविस्तार केला जाणार असल्याने फडणवीस यांनाही केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest marathi News)
2 जुलैची दुपार महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी होती. अजितादादांच्या भुमिकेनं सगळेचं चकीत झाले. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्याला आता एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 26 मंत्री मिळाले आहेत. येत्या काही दिवासात ती अधिक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत रवानगी केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड करून भाजपसोबत जात हातमिळवणी केली. एकत्रित येत सत्ताही स्थापन केली. त्यावेळी सगळ्यांना वाटत होतं, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार. पण तसं न होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
अगदी काही काळापूर्वी मुख्यमंत्रीपद गाजवलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री पचवणं किती कठीण होतं, हे त्यांनी अनेकदा सांगितलंय. पण पक्षाचा आदेश 'सर आँखों पर' म्हणत, फडणवीसांनी नमतं घेतलं.
पण आता पुन्हा एक मोठा पेच उभा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दोन्ही नेते तोडीस तोड आहेत. दोघांचा कामाचा आवाका मोठा आहे. अनुभवही दांडगा आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्रित काम कसं करणार, तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे. .
3 आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या एका जाहिरातीनं शिंदे-फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. अखेर जाहिरात बदलल्यानंतर भाजपचे नेते थोडे नरमले. एका जाहिरातीमुळे वाद होऊ शकतो तर आता तीन मोठे नेते एकत्र आल्यावर काय होईल हा प्रश्नच आहे.
याचा विचार ही कदाचित भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केलाच असेल. म्हणूनच की काय फडणवीसांना दिल्लीत मंत्रिपद देऊन दिल्लीकर करण्याच्या चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, तीन विरोधी टोकांचा एकत्रित निभाव कसा लागेल? हाच प्रश्न भाजपच्या श्रेष्ठींना पडला असावा. म्हणूनच की काय आता देवेंद्र फडणवीसांची रवानगी दिल्लीला होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.