Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे छगन भुजबळ नाराज, ओबीसी आरक्षणावर CM फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis on OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान ओबीसी आरक्षणावर CM फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis Saam tv
Published On
Summary

छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने नाराजीचे संकेत

मुख्यमंत्री फडणवीसांनी भुजबळ नाराज नसल्याचे म्हटलं

मराठा आरक्षणावर आधारित जीआर हा पुराव्यांवर आधारित असून ओबीसींवर अन्याय होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं

मुंबई : राज्य सराकरच्या काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नाराजीची जोरदार चर्चा झाली. मात्र, छगन भुजबळ नाराज नसल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते रायगडमध्ये बोलत होते.

Devendra Fadnavis News
Mumbai Konkan Ro Ro Ferry : तळकोकणात पोचा अवघ्या पाच तासात; आता मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रायगड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं. 'मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत माझी चर्चा झाली. ते नाराज नाहीत. छगन भुजबळ यांच्या मनातील संभ्रम दूर करू. जीआरमुळे ओबीसी समाजावर परिणाम, अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समजाला दिली.

Devendra Fadnavis News
Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

'कुणावरच अन्याय होऊ देणार नाही. सरसकट आरक्षणाचा जीआर नाही. काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. मराठा आरक्षणच्या जीआरचे काही ओबीसी संघटनाकडून कौतुक केले. खऱ्या कुणबींनाच या जीआरचा फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

'हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचा जीआर आहे. मराठवाड्यातील पुरावे हैद्राबाद संस्थानात सापडतात. तेथील पुरावे ग्राह्य धरले आहेत. जे खरे कुणबी आहेत. त्यांनाच हे पुरावे सापडणार आहेत. कोणालाही खोटेपणा करता येणार नाही. अशा प्रकारचा जीआर असल्यामुळे ओबीसींनीही त्याचं स्वागत केलं आहे, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis News
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

'छगन भुजबळ यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांना मी आस्वस्थ केलं आहे. या जीआरमुळे ओबीसींवर कोणताही परिणाम होणार नाही. भुजबळांच्या मनातील शंका दूर करू. एक गोष्ट ओबीसी नेत्यांना माहीत आहे की, 'जोपर्यंत आमचं राज्य आहे,तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, असेही फडणवीसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com