Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam tv
Published On

Kasba Peth Election News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान फडणवीसांनी प्रचार करताना आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Kasba-Chinchwad Result Live : भाजप उमेदवार अश्विनी जगतापांची आघाडी कायम, महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर

नुकताच कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराचा धुराळा पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. निवडणूकीत आपल्याच उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोठमोठ्या सभा देखील घेतल्या.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटलं होतं. याच विधानाचा आधार घेत रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.  (Maharashtra Political News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा करत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी तक्रार दाखल करत निवडणूक आयोगाकडे रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Devendra Fadnavis
Udayanraje Bhosale News : दोन दिवसात धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवा, अन्यथा.., उदयनराजेंचा सरकारला इशारा

रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेससकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून हेमंत रासने यांना मैदानात उतरविण्यात आले होते. अत्यंत चुरशीची अशी निवडणूक पाहायला मिळाली होती.

कसबा-पिंपरी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जागांवर आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी सर्वांनीच मोठा प्रचार केला होता. 

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com