Theft Crime News : दौंड शहरात चाललंय तरी काय? भर बाजारात एकाच वेळी ३ दुकानांमध्ये चोरी

Crime News : भरबाजार परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Daund News
Daund NewsSaam tv
Published On: 

Daund Crime News : दौंड शहरात चोरीची एक मोठी घटना घडली आहे. शहरातील उप अधिक्षक कार्यालयामागील एकून ३ दुकानांमध्ये चोरी झाली आहे. या दुर्घटनेत तब्बल ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ५ तरुणांच्या टोळक्याने एकत्र येत काल रात्री ही चोरी केली आहे. भरबाजार परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Daund police)

दौंड पोलिस उप अधीक्षक कार्यालयामागे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काशिनाथ कांबळे यांच्या कुबेर वुलन्स या कापड दुकानात पहाटे साडेतीन वाजता चोरी झाली. तीन चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील १२ हजार ८१० रूपयांची रोकड चोरून नेली.

Daund News
Latur Crime News: लातूरमध्ये चोरांचा 'जामतारा पॅटर्न', एक फोन कॉल आणि बँकेतून गायब झाले लाख रुपये

त्यानंतर चौकातील सातपुते बंधू यांच्या कालिका सुपर मार्केट या भांड्यांच्या आणि नित्योपयोगी वस्तूंच्या दुकानात चोरी झाली. पाच तरूणांच्या टोळक्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच गल्ल्यातील एकूण ५२ हजार ४७० रुपयांची रोकड लंपास केली आहे. त्यानंतर श्री सिंधी धर्मशाळा ते रेल्वे कामगार मैदान रस्त्यावरील किशोर सेवानी यांच्या दुकानाचे शटर उचकटण्यात आले.

येथे देखील मोठी चोरी झाल्याचे मसजले आहे. मात्र या दुकानमालकाने पोलीस ठाण्यात तक्रार न दिल्याने खरा आकडा कळू शकलेला नाही. चोरी झालेल्या ठिकाणी तेथीर दुकानदारांनी पोलिसांत याब्बत तक्रार दाखल केली असून दौंड पोलिसांनी अज्ञातांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Daund News
Daund News: आत्महत्या नव्हे; थंड डोक्याने संपवलं अख्ख कुटुंब, मन सुन्न करणाऱ्या घटनेचा उलगडा, चार जणांना अटक

दौंड (Daund) शहर व परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांचा धाक कमी झाला आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कारवाई पेक्षा तडजोडींकडे अधिक लक्ष दिले जात असल्याने पोलिस ठाण्यात बेबनावाची स्थिती आहे. दरम्यान पुणे जिल्हा भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची भेट घेत गस्त वाढविण्याची मागणी केली. दौंड मर्चंट असोसिएशन व दौंड व्यापारी महासंघ व पदाधिकार्यांनी पोलिसांकडे रात्री आणि पहाटे गस्त वाढवून चोरांना अटक करण्याची लेखी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.