Latur Crime News: लातूरमध्ये चोरांचा 'जामतारा पॅटर्न', एक फोन कॉल आणि बँकेतून गायब झाले लाख रुपये

Credit Card Fraud : लातूरमध्ये क्रेडिट कार्डची माहिती घेऊन लाखाची फसवणूक
Latur Crime News
Latur Crime NewsSaamTv
Published On

>> दीपक क्षीरसागर

Latur Latest News : लातूरमध्ये चोरांचा 'जामतारा पॅटर्न' पाहायला मिळाला आहे. येथे एका व्यक्तीची एसबीआय बँकेतून (Sbi Bank) बोलत असल्याचा बनाव करत ओटीपी घेऊन लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. उदगिरातील नालंदानगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime News
Ajit Pawar News: अजित पवार नॉट रिचेबल? दिवसभराचे कार्यक्रमही अचानक रद्द, पक्षाचे ७ आमदार संपर्काबाहेर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मिळालेल्या माहितीनुसार, माधव बापूराव कांबळे यांना अनोळखी व्यक्तीने एसबीआय बँक क्रेडिट कार्डमधून बोलत आहे, असं खोटं सांगत ओळख लपवत आपल्या मोबाईलवरून फिर्यादीला व्हिडीओ कॉल केला. या भामट्याने माधव यांना 'मी रोहित गुप्ता बोलत आहे', असं सांगितलं. त्याने माधव यांना घाबरवत तुमचा क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, तो चालू ठेवायचा असेल तर आम्ही मागत असलेली माहिती द्या, असं सांगत त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली.  (Latest Marati News)

यानंतर या भामट्याने माधव यांच्याकडून त्यांचा मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. माधव यांनी जसा या चोराला ओटीपी दिला, त्यानंतर लगेचच त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून एक लाख रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच माधव कांबळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

Latur Crime News
Eknath Shinde On Sharad Pawar: शरद पवार यांच्या अदानी समूहावरील वक्तव्यावर CM एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

याप्रकरणी माधव कांबळे यांच्या तक्रारीवरून रोहित गुप्ता याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चोरच हे नाव बनावटी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस याप्रकरणी चोकशी करत असून चोराचा शोध घेत आहे.

दरम्यान, याआधीही चोरीचे असे बरेच प्रकार घडले आहे. कोणत्याही प्रकारचा ओटीपी कधीही कोणाशीही शेअर करू नका, असं आवाहन अनेकवेळा सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तरी देखील अनेक वुयक्ती अजूनही अशा चोरांच्या जाळ्यात अडकत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com