Daund News: आत्महत्या नव्हे; थंड डोक्याने संपवलं अख्ख कुटुंब, मन सुन्न करणाऱ्या घटनेचा उलगडा, चार जणांना अटक

Death of Seven People in Pune: यवतमधील सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे.
Daund news
Daund newsSaam TV

पुणे: पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात काल एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.भीमा नदीत पात्रात सात जणांचे मृतदेह आढळले होते. घटनेनंतर या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या सर्वांची आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यवतमधील सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली आहे. चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Daund news
Beed News : पालकांच्या अपेक्षा मुलांच्या जीवावर बेतत आहेत? बीडमधून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

चार जणांना अटक

मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे हत्याकाडं केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण फरार आहे.

हत्येचं कारण

पूर्व वैमनस्यातून चुलत भावाने हत्या केली आहे. सहा महिन्यापूर्वी या आरोपी चुलत भावांपैकी एकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू नसून मोहन पवार यांनी खून केल्याचा संशय या चौघांना होता त्यामुळे ही हत्या झाल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे.

Daund news
Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'CM शिंदे कार्यक्रमात...'

मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. कुटुंबातील चार वर्षाच्या आतील तीन लहान मुलांचाही यात समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com