Beed News : पालकांच्या अपेक्षा मुलांच्या जीवावर बेतत आहेत? बीडमधून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

बीडमध्ये गेल्या वर्षभरात 18 वर्षाखालील तब्बल 30 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवल आहे.
File Photo
File Photo Saam TV
Published On

बीड : आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सरकारी अधिकारी व्हावं अशा मोठ्या अपेक्षा पालकांच्या असतात. मुलांची क्षमता आणि पालकांच्या अपेक्षा अनेकचा जुळत नाहीत. मात्र पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली मुलं जगत असतात. याचा विपरित परिणाम मुलांवर होत असतो. बीडमध्ये या ओझ्याच्या भीषण वास्तवाची आकडेवारी समोर आली आहे.

बीडमध्ये गेल्या वर्षभरात 18 वर्षाखालील तब्बल 30 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवल आहे. त्यामुळे आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपले मूल दडपणाखाली तर येत नाही ना? हे देखील पालकांनी पाहणे गरजेचे आहे. अन्यथा मानसिक तणावातून खचलेली मुले टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर आलं आहे. (Latest Marathi News)

File Photo
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचं सावट; मुंबईतील हालचालींनी तपास यंत्रणा सतर्क

बीडच्या केज तालुक्यातील कोठी येथे दहावीत शिकणारी प्रेरणा किसन डोंगरे वय 16 या विद्यार्थिनीने अभ्यास करूनही लक्षात राहत नाही, या कारणामुळे 16 जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोविडचे संकट दूर झाल्याने परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमांवर होत आहेत. विद्यार्थी झपाट्याने अभ्यासाला लागले आहेत. मात्र ते तणावात आहेत का हे देखील पालकांनी पाहिलं पाहिजे.

File Photo
Mental Health : 'या' टिप्स मुलांना परीक्षेच्या काळात तणावमुक्त ठेवतील, पालकांनी आताच फॉलो करा

तणावातून जीवन संपवलेल्या 30 मुलांमध्ये 18 मुलांचा तर 12 मुलींचा समावेश आहे. त्यापैकी 7 मुलांनी तर 9 मुलींनी अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केलीय. तर उर्वरित 11 मुलांनी आणि 3 मुलींनी इतर कारणावर आत्महत्या केली आहे. त्यामुळे पालकांनी आपली मुलं परीक्षेच्या अभ्यासाचा ताण तर घेत नाहीत ना? हे पाहणं गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com