डॉक्टरकडे तपासणीसाठी महिला गेली अन् लाखोंची सोनसाखळी गायब; CCTV पाहताच पोलिसांना मिळाला धक्कादायक धागा

Dahisar West Crowded Clinic Gold Chain Theft Case Medical Representative Arrested: दहिसर पश्चिमेतील गर्दीच्या क्लिनिकमध्ये ५८ वर्षीय महिलेची सुमारे अडीच लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेली. MHB पोलिसांनी CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक करून सोनसाखळी हस्तगत केली.
DAHISAR CLINIC GOLD CHAIN THEFT
DAHISAR CLINIC GOLD CHAIN THEFTsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

दहिसर पश्चिमेतील गर्दीच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या ५८ वर्षीय महिलेची लाखो रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा MHB पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी मिरा रोड पूर्व येथे राहणाऱ्या संजय ओमप्रकाश दुबे (३६) या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चोरीची सोनसाखळी हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

DAHISAR CLINIC GOLD CHAIN THEFT
Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

पोलिसांच्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी बोरीवली येथील रहिवासी आपल्या आईला उपचारासाठी दहिसर पश्चिमेतील नवा गाव, एल.एम. रोडवरील एका क्लिनिकमध्ये घेऊन आले होते. संबंधित महिला सरोज (५८) यांना मधुमेहासह त्वचेशी संबंधित त्रास असल्याने त्या उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.

DAHISAR CLINIC GOLD CHAIN THEFT
Shocking : "...आई मला मारू नकोस" गळा दाबला, बादलीत बुडवलं; निर्दयी महिलेने पोटच्या १० महिन्यांच्या मुलीची केली हत्या

तपासणीपूर्वी काढली सोनसाखळी

सकाळी सुमारे ११.४० वाजता डॉक्टरांनी मानेची तपासणी करण्यासाठी सरोज यांना सोनसाखळी काढण्यास सांगितले. क्लिनिकमध्ये मोठी गर्दी असल्याने त्यांनी सोनसाखळी तात्पुरती चप्पल ठेवण्याच्या स्टँडवर ठेवली. त्यानंतर त्या हँडबॅगची चेन उघडण्यासाठी खाली वाकल्या.याच काही सेकंदांच्या कालावधीत सोनसाखळी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीला गेलेल्या सोनसाखळीत दोन पेंडंट असून तिचे वजन सुमारे १९ ग्रॅम आहे. तिची अंदाजे किंमत २.३० ते २.५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी क्लिनिकमध्ये तसेच परिसरात शोध घेतला; मात्र सोनसाखळीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी MHB पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com