Pune Crime: पुण्यात सायबर फसवणूक, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली दोघांची ४१ लाखांची फसवणूक

Pune Cyber Crime: घोरपडे पेठेतील ३७ वर्षीय महिला आणि पाषाणमधील ४४ वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी ४१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलीस तपास सुरू आहे.
Pune Cyber Crime
Pune Cyber CrimeFreepic
Published On

घोरपडे पेठेतील ३७ वर्षीय महिला आणि पाषाणमधील ४४ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुंढवा आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत घोरपडे पेठेतील एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पहिल्या घटनेत घोरपडे पेठेतील महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास जिंकला. डिसेंबर ते जानेवारी या काळात, वेगवेगळ्या वेळेस महिलेकडून २३ लाख ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, परतावा मागितल्यानंतर पैसे न मिळाल्याने महिलेला फसवणुकीची जाणीव झाली.

Pune Cyber Crime
Navi Mumbai Crime: दहावीतील वर्गमैत्रिणीशी जवळीक साधून शारीरिक संबंध; अल्पवयीन पीडित गरोदर, गैरप्रकाराचा उलगडा

दुसऱ्या घटनेत पाषाणमधील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी सप्टेंबरमध्ये मोबाईलवर लिंक पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळेल, असा संदेश देऊन त्यांनी सुरुवातीला थोडा परतावा देत व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, या व्यक्तीकडून १७ लाख ७४ हजार रुपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र, यावर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली.

Pune Cyber Crime
Bhiwandi Crime: भिवंडीत घुसखोर बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई, ९ महिलांना अटक

सायबर पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, तसेच कोणतीही लिंक डाऊनलोड करताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनांमुळे नागरिकांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे.

Pune Cyber Crime
Pune Crime: पुण्यात चाललंय काय? थेट सोसायटीमध्ये घुसून चोरट्याने महिलेची सोनसाखळी हिसकावली, घटना CCTV मध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com