HSC-SSC Exam: कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाचा दणका, कॉपी करण्याचा विचारही करु नका, अन्यथा...

परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे.
Exam
Examsaam tv

>> सचिन जाधव

पुणे : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थी देखील परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. विद्यार्थ्यांसोबत बोर्ड देखील परीक्षेसाठी सज्ज झालं आहे. दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या असा शिक्षण मंडळाचा आग्रह आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने कडक पावलं उचलण्याचा पवित्रा घेतला आहे.

कॉपी बहाद्दरांना दणका देण्याची तयारी आता शिक्षण मंडळाने केली आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने असा इशारा दिला आहे.

Exam
Satyajeet Tambe Car: सत्यजित तांबेचा 'कार'नामा, संपूर्ण निवडणुकीदरम्यान वापरलेल्या कारची जोरदार चर्चा

उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार?

राज्य शिक्षण मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे. आतापर्यंत 10 मिनिटे उशीर झाला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु याचा गैरफायदा विद्यार्थ्यांकडून घेतला जात असल्याचं निदर्शनास आल्याने मंडळाने हा निर्णय घेतला आहे

Exam
Cricket February Schedule: टीम इंडियाचं फेब्रुवारी महिन्यातील सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक, क्रिकेट चाहत्यांनी तर चेक कराच

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com