Crime News: तीन अट्टल चोर पोलीसांच्या जाळ्यात

यातील एक चोर रातअंधळा असल्याने तो दिवसा चोरी करायचा
Crime News: तीन अट्टल चोर पोलीसांच्या जाळ्यात
Crime News: तीन अट्टल चोर पोलीसांच्या जाळ्यात Saam TV
Published On: 

सूरज सावंत

मुंबई : मुंबईच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पोलिसांनी (Police) तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या आरोपीची खासियत म्हणजे ते दिवसा नागरिकांच्या डोळ्या देखत चोऱ्या (Theft) करायचे आणि समोरच्याला कळायचं देखील नाही. या मागचं कारण म्हणजे यातील मुख्य आरोपी हा रातअंधळा होता. रात्री दिसायचं नाही म्हणून दिवसा चोऱ्या करायचा. मागील अनेक दिवसांपासून पोलिस या आरोपींच्या मागावर होते. अखेर वाकोला पोलिसांनी (Wakola Police) या तिघांचा पर्दाफाश करत, त्यांना बेड्या ठोकल्या.

हे देखील पहा

धारावी (Dharavi) परिसरात राहणाऱ्या करामत अलीला काही दिवसांपूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा कबूली न करणाऱ्या करामत अलीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर दोन आरोपी म्हणजेच राकेश खरटमोल आणि रोहित राठोड यांची नावे समोर आली. पोलिसांनी मोठ्या शिताफिने या दोघांना अटक केली. चौकशीत हे आरोपी करामत हा रात अंधळा असल्याने दिवसाढवळ्या चोरी करत असल्याची कबूली दिल्याने पोलिसांच्या भूवया ही उंचावल्या. मग काय उगाच आव्हान दिल्यावर कुणीच गप्प बसत नाही.

Crime News: तीन अट्टल चोर पोलीसांच्या जाळ्यात
चोरांचा हैदोस, एकाच इमारतीत तीन फ्लॅट फोडले

पोलिस तपासात या आरोपीवर विविध पोलिस ठाण्यात ३५ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले. चोरी करण्यासाठी सर्वात तीक्ष हत्यार म्हणून गाडयांचे नटबोल्ट आवळयासाठ वापरला जाणारा पोपट पाना सोबत ठेवायचे. झोपडपट्टी परिसरातचहे आरोपी चोर्या करायचे. या आरोपीकडून पोलिसांनी आतापर्यंत ८ लाखांचं सोनं हस्तगत केलं आहे. चोरी केलेलं सोनं हेआरोपी पत्नीकडे अहमदाबादला पाठवायचे, पत्नी तिकडे नवर्यासोबत पटत नसल्यानं उदर निर्वाहासाठी सोनं विकत असल्याचं भासवून आरोपींना मदत करत असल्याचे प्राथमिक आरोपींच्या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com