Mumbai Pune Highway News: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटी, वाहतूक ठप्प

Mumbai Pune Highway Accident News: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटी, वाहतूक ठप्प
Mumbai Pune Highway Accident News
Mumbai Pune Highway Accident NewsSaam Tv

Mumbai Pune Highway Accident News: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर पलटी झाला. यामुळं पुण्याकडे जाणारी वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडलेली आहे.

कंटेनर बाजूला घेण्याच काम युद्धपातळी सुरू आहेत. एक्सप्रेस-वे वरील खोपोली एक्झिट येथे अपघात घडला असून मुंबई च्या दिशेने कंटेनर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कंटेनर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पलटी झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

Mumbai Pune Highway Accident News
Rahul Gandhi No Confidence Motion: राहुल गांधीची तोफ उद्या धडाडणार, मोदी सरकारविरोधीत अविश्वास प्रस्तावावर काय बोलणार?

बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली होती.  (Latest Marathi News)

या अपघातात भरधाव ट्रक पलटी झाल्याने एक जण जखमी झाला होता. हा अपघात धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या पाडळसिंगी टोलनाका परिसरात झाला होता.

Mumbai Pune Highway Accident News
Anurag Thakur On Newsclick: 'न्यूजक्लिक आणि काँग्रेसला चीनमधून फंडिंग', भाजपचा गंभीर आरोप

घटनेची माहिती कळताच महामार्ग रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेत विशाल डोंगर, यशवंत शिंदे यांनी प्रथमोपचार केले होते. तर यावेळी प्रतिक कदम, अंबादास जाधव, महादेव पवार, आकाश फुलझळके, मारुती चित्रे यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com