Anurag Thakur On Newsclick: 'न्यूजक्लिक आणि काँग्रेसला चीनमधून फंडिंग', भाजपचा गंभीर आरोप

Anurag Thakur On Congress: 'न्यूजक्लिक आणि काँग्रेसला चीनमधून फंडिंग', भाजपचा गंभीर आरोप
Anurag Thakur
Anurag ThakurSaam tv

Anurag Thakur On Newsclick And Congress: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत घेत न्यूजक्लिक आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. न्यूजक्लिकला चीनकडून फंड मिळत असल्याचा त्यांनीआरोप केला आहे. चीनने न्यूजक्लिकला करोडो रुपये दिले होते, असं ते म्हणाले आहेत.

काँग्रेसने भारताच्या विरोधकांशी हातमिळवणी केली. तर मोफत बातम्यांच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. काँग्रेस तुकडे तुकडे टोळीसोबत आहे. राजीव गांधी फाऊंडेशनलाही चीनकडून पैसे मिळाले आहेत, असेही ठाकूर म्हणाले. यापूर्वी रविवारीही अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्ष आणि विरोधी आघाडीवर हल्लाबोल केला होता.

Anurag Thakur
Jayakwadi Dam News: मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट, 11 धरणातील पाणीसाठा पाहून येईल डोळ्यात पाणी...

अनुराग ठाकूर म्हणाले की, अहंकारी आघाडीचे नेते भारताच्या हिताचा विचार कधीच करू शकत नाहीत. काँग्रेस चायना न्यूजक्लिक एकत्र असून ते भारतविरोधी आहेत. राहुल गांधींच्या बनावट प्रेमाच्या दुकानात चिनी वस्तू उपलब्ध आहेत. (Latest Marathi News)

चिनी प्रायोजित संस्थेने यांना फंडिंग केली आहे. ही फंडिंग निवेल सिंघम यांनी केली होती. ज्याला चीनकडून निधी दिला जातो. आम्ही 2021 मध्ये NewsClick बद्दल सांगितले. ते मोफत बातम्यांच्या नावाखाली खोट्या बातम्या देतात.

Anurag Thakur
Supreme Court On Manipur Clashes : मणिपूर हिंसाचाराची 'सर्वोच्च' चौकशी; सुप्रीम कोर्टानं नेमली ३ माजी न्यायाधीशांची समिती

अनुराग ठाकूर म्हणाले, ''गौतम नौलखा यांच्यावर यूएपीए लादण्यात आले आहे. त्यांनी एका इलेक्ट्रिशियनला दीड कोटी रुपये दिले. यावर राहुल गांधी यांनी कधीही प्रश्न उपस्थित केला नाही. आज जर ईडीने न्यूजक्लिकवर कारवाई केली, तर ते (राहुल गांधी) त्यांच्या विरोधात आहे. देशाच्या विरोधात कोणी असेल तर आपण सगळ्यांनी त्या विरोधात एकत्र यायला हवं, असे अडवाणी म्हणाले होते. राहुल गांधी चीनमध्ये गेले आणि तेथे त्यांनी करार केला. यानंतर राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे देण्यात आले. सोनिया गांधी यूपीए अध्यक्षा असताना ही रक्कम देण्यात आली होती.''

ते पुढे म्हणाले, ''राहुल गांधी यांनी अमेरिकेत चीनचे कौतुक केले. काँग्रेस चायना आणि न्यूजक्लिक हे एकाच माळेचे मणी आहेत. न्यूजक्लिकने नवल सिंघमला 27 कोटी दिले, त्यापैकी 20 लाख गौतम नौलखाला गेले. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या एनजीओच्या माध्यमातून न्यूजक्लिकलाही पैसे देण्यात आले आहे.'' दरम्यान, भाजपच्या या आरोपावर काँग्रेसने अद्याप आपली बाजू मांडलेली नाही. मात्र ते लवकरच आपली बाजू स्पष्ट करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com