Manipur Clashes : मणिपूर हिंसाचाराची 'सर्वोच्च' चौकशी; सुप्रीम कोर्टानं नेमली ३ माजी न्यायाधीशांची समिती

Supreme Court On Manipur Clashes Update News : मणिपूर हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली आहे.
Supreme Court's Decision on Manipur Clashes
Supreme Court's Decision on Manipur ClashesSAAM TV
Published On

Supreme Court On Manipur Clashes:

मणिपूर हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमली आहे. या समितीत हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्ती गीता मित्तल, शालिनी जोशी, आशा मेनन यांचा समावेश आहे. गीता मित्तल या या समितीच्या अध्यक्ष असतील. (Latest Marathi News)

मणिपूर हिंसाचार प्रकरणी (Manipur violence Case) सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या घटनेच्या चौकशीसाठी हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली.

सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, 'आम्ही एका माजी आयपीएस अधिकाऱ्याची (IPS Officer) नेमणूक करणार आहोत. सीबीआय चौकशीवर (CBI Inquiry) त्यांचे लक्ष असेल. महिला अत्याचार प्रकरणात दाखल ११ एफआयआरची चौकशी सीबीआय करेल. सीबीआय तपास प्रमुख माजी आयपीएस अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर असतील.'

राज्यात स्थापन केलेल्या ४२ एसआयटी तपासावरही देखरेख ठेवतील. या एसआयटीचे प्रमुख पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. प्रत्येक एसआयटीमध्ये एक पोलीस निरीक्षक असेल. तो अधिकारी राज्याबाहेरचा असेल, असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.

एसआयटीच्या तपासावर देखरेखीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाचे ६ अधिकारी असतील. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या तीन माजी न्यायाधीशांच्या समितीची स्थापना केली. ही समिती पुनर्वसन, भरपाई, देखरेख आदी काम करेल. या समितीत हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश गीता मित्तल, शालिनी जोशी, आशा मेनन असतील. मित्तल या समितीच्या अध्यक्ष असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com