पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

congress leader abhay chhajed accident News : काँग्रेस नेते अभय छाजेड यांचा कारचा पुण्यात अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
pune accident news
pune accident Saam tv
Published On
Summary

पुण्यात काँग्रेस नेत्याच्या कारचा अपघात

कार अपघातात काँग्रेस नेते छाजेड जखमी

छाजेड यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू

पुण्यात अपघातांच्या मालिका सुरूच आहे. पुण्यात पुन्हा सोमवारी रात्री अपघाताची दुर्घटना घडली. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यांच्या कारचा सोमवारी रात्री ९ वाजता अपघात झाला. या अपघातात छाजेड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या अपघातानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या कारचा अपघात पुण्यातील पिरंगुट परिसरात अपघात झाला. काल रात्री ९ वाजता झालेल्या अपघातात छाजेड यांच्या पायाला आणि डोक्याला मार लागला. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि रस्त्यावर उभे असलेले लोक मदतीला धावले. त्यांना तातडीने पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाय आणि डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. नियंत्रण सुटल्यामुळे गाडी टेकडीला धडकल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

अपघात कसा झाला?

अभय छाजेड हे पिंरगुटच्या आर्किटेक्चर कॉलेजमधून पुण्याच्या दिशेने कारने येत होते. चालकाच्या शेजारी बसले होते. पिरंगुट घातात त्यांच्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर त्यांची कार टेकडीला आदळली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना ओळखले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने पुना रुग्णालयात दाखल केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय छाजेड यांना कंबरेच्या खाली मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. वकील असलेले अभय छाजेड हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मानले जातात. तसेच पुण्यातील प्रमुख नेते आहेत. ते पुणे महापालिकेचे पाच वेळा नगरसेवक राहिले आहेत. ते सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.

भोरमध्ये भीषण अपघात

पुण्यातील भोरच्या कापूरहोळ मार्गावर खंडोबा माळ परिसरात अपघात झाला. भरधाव कार रस्त्याकडे जाऊन उलटून अपघात झाला. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु अपघातात कार चालक गंभीर जखमी झालाय. तर कारचही मोठं नुकसान झालं आहे. एका तीव्र वळणावर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदतकार्य करत जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com