१८ मंत्र्यांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde saam tv
Published On

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप गटातील प्रत्येकी ९-९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde
Maharashtra Cabinet Expansion 2022 : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणी घेतली शपथ

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

विधानभवानात १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असं काल परवाच तुम्ही सर्वजण विचारत होता. आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. सर्व मंत्री आपआपल्या विभागाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडतील. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतील. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सर्व मंत्री आपआपल्या विभागाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचं काम करतील. एक चांगलं काम एक गतीमान सरकार सर्वसामान्यांचं सरकार अशा प्रकारचं काम आमच्या मंत्र्यांकडून होईल. शिवसेना भाजप युतीचं सरकार लोकाभिमुख काम करेल. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. (Maharashtra Mantrimandal vistar 2022)

Eknath Shinde
Sanjay Rathod vs Chitra Wagh: संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यानंतर चित्रा वाघ संतप्त; म्हणाल्या...

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी बंडाळी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदेंनी भाजसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या महिन्याभरापासून राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार प्रलंबित होता. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं.

दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात १८ आमदारांनी शपथ घेतली. भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. फक्त तानाजी सावंत हे एक नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात नवीन आहे. इतर सर्व हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com