मुंबई - राज्यातील शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, मंगळवारी होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सुद्धा शपत घेतली आहे. यावर आता भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत चित्र वाघ यांनी आपली प्रतिकाय दिली आहे. तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देणे अत्यंत दुर्दैवी आहे, त्यांच्याविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार वाघ यांनी व्यक्त केला
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कोणताही आरोप नसलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र, मागील सरकारमध्ये एका तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.
एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही मी त्यांच्याविरुद्धचा माझा लढा सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे और जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका होत होती. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. आज मंगळवारी राजभवनात सकाळी ११ वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन मंत्र्यांना पदाची शपथ दिली.
काय आहे प्रकरण?
७ फेब्रुवारी २०२१ ला एका मुलीने पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आले होते. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आज उठवला होता, २८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पण आता संजय राठोड यांनाच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यामुळे टीका सुरू झाल्या आहेत. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.