'शिवसेनेचा व्हिप आम्हाला लागू होत नाही'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

शिवसेनेचा (Shivsena) व्हिप आम्हाला लागू होत नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.
Eknath shinde
Eknath shinde saam tv

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने व्हिप जारी केला आहे. सर्व शिवसेना आमदारांना विधान भवनात हजर राहून उमेदवार राजन साळवी यांनी मतदान करण्याचा व्हिप जारी करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेचा (Shivsena) व्हिप आम्हाला लागू होत नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. ( Eknath Shinde News In Marathi )

Eknath shinde
....पण कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, शरद पवारांचा टोला

उद्या, रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार राजन साळवी यांच्यात थेट लढत होणार आहे. राजन साळवी हे राजापूर येथील शिवसेनेचे आमदार आहेत. तर राहुल नार्वेकर हे मुंबईतील भाजपचे आमदार आहेत. राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षासारखी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

शिंदे गटात एकूण ३९ शिवसेना आमदार आहेत. त्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने व्हिप जारी केला आहे. ' उद्धव ठाकरे यांना व्हिप जारी करण्याचा अधिकार नाही. शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी अधिकाराच्या बाहेर जाऊन आपल्या शक्तीचा गैरवापर केला आहे,असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच सदर व्हिप आम्हाला लागू होत नाही, असे देखील शिंदे यांनी सांगितले.

Eknath shinde
कुस्तीगीर संघटनेत राजकारण नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'आम्ही बहुमत सिद्ध करण्यास जात आहोत. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. आमच्या जवळ १२० आणि ५० असे एकूण १७० आमदार आहेत. त्यामुळे विजय आमचाच होणार आहे. त्यामुळे निश्चित विजय हा राहुल नार्वेकर यांचा होईल`'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com