कुस्तीगीर संघटनेत राजकारण नाही; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

कार्यकारिणी बरखास्त करण्यामागे राजकारण आहे असं सांगितलं गेलं. मात्र, पण असं काही नाही त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.
sharad pawar
sharad pawar saam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : क्रीडा प्रकारात राजकारण कुठलेही नेते आणत नाहीत. महाराष्ट्रात सरकार बदललं म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करण्यामागे राजकारण आहे असं सांगितलं गेलं. मात्र, पण असं काही नाही त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केल्याच्या विषयावर भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हे शरद पवार (Sharad Pawar) होते. (Sharad Pawar News In Marathi )

sharad pawar
...तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही; अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, 'भारतीय कुस्तीगीर संघटनेला अधिकार आहेत. राज्य शाखेत काही कमतरता असू शकतात, पण त्या नजरेस आणून द्यावे लागतात. राज्य कुस्तीगीर परिषदेचा मी अध्यक्ष आहे. तसेच काही संघटनांसोबत काम करतो'.

अर्थ सहाय्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, काही खेळाडूंना शिष्यवृत्ती हवी असते. माझं काम हे आहे खेळाडूंना मदत करणं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मैदान घेतलं, तिकडे चांगलं ट्रेनिंग होतं. खेळाडूंना निवृत्तीनंतर त्यांना हातभार लावला जातो. काही खेळाडू राज्य, देश, जागतिक पातळीवर चमकत आहेत. या खेळाडूंना मदत करणं माझं काम आहे. मी कुस्तीगीरांना मदत केली. राहुल आवारे, उत्कर्ष काळे, अभिजीत कटके यांच्यात पुढे जाण्याची धमक आहे. या खेळाडूंना प्रशिक्षण आणि खुराक यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये दिले आहेत', असेही पवारांनी सांगितले.

sharad pawar
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना व्हिप बजावणार, सचिन अहिरांचा इशारा

'कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यासाठी काही तक्रारी पुणे जिल्हा आणि इतर ठिकाणांहून देखील गेल्या आहेत. पण बरखास्त करण्याचं कारण विचारलं असता त्यांना काही तक्रारी आल्या होत्या. क्रीडा प्रकारात राजकारण कुठलेही नेते आणत नाहीत. महाराष्ट्रात सरकार बदललं म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करण्यामागे राजकारण आहे असं सांगितलं गेलं. मात्र, पण असं काही नाही त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. आम्ही एक बैठक घेऊ त्यात काही गैरसमज असतील तर सोडवू इकडे सुटत असतील तर इकडे, नाही तर दिल्लीत जाऊन प्रश्न सोडवू. या निर्णयाचा खेळाडूवर कुठलाही परिणाम होणार नाही', असेही शरद पवारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com