CM Eknath Shinde Interview : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? CM एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं, पाहा व्हिडिओ

CM Eknath Shinde excusive Interview : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? CM एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं, पाहा व्हिडिओ
CM Eknath Shinde Interview: Saam tv
Published On

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. याच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत महत्वाचं भाष्य केलं. 'आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारमार्फत करत आहोत. आम्हाला लोक कामाची पोचपावती देतील. आता कशाला काय? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केलं.

महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? CM एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं, पाहा व्हिडिओ
Sarkarnama Weekly: नव्या रुपात, नव्या ढंगात, 'सरकारनामा साप्ताहिका'चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

'बाळासाहेब असताना दिल्लीतील चेहरे मुंबईत यायचे. आम्ही २४ तास काम करतो. पंतप्रधान मोदी काम करत आहे. अर्थव्यवस्था डबघाईला असताना चांगलं काम सुरु आहे. आज मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काम करत आहेत, असे ते पुढे म्हणाले.

शिवसेना फुटीवरही मुख्यमंत्री शिंदेंनी भाष्य केलं. 'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा मोह होता. या मोहामुळे वैचारिक भूमिका बाजूला पडतात. मी त्यावेळी प्रयत्न केला. पण यश आलं नाही. आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवायची होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारच्या योजनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आज लाडकी बहीण योजना, लेक लखपती योजना आहे. मुलींना उच्चशिक्षणासाठी सरकारने भार उचलला. देशातील पहिलं सरकार जे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा भत्ता देत आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट दिलं आहे'.

महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? CM एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं, पाहा व्हिडिओ
CM Eknath Shinde Exclusive : 'महायुतीचा कॅप्टन मीच', CM शिंदे काय म्हणाले? वाचा

योजना निवडणुकांपर्यंत आहेत, या विरोधकांच्या आरोपावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, ' आम्ही प्रिटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत. आमच्याकडे पैसे नाही, असं म्हणालो का? आम्ही तरतूद केली आहे. या योजना पूर्णपणे सुरु राहतील. काही लोक कोर्टात गेले. काही लोक भीक असल्याचं म्हटलं. अनेकांनी बदनामी केली. मुख्यमंत्री म्हणून मी जे बोललो, ते सामूहिकपणे केलं आहे. ही योजना सुरु राहणार आहे. सावत्र भाऊ खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमच्या बहिणींना कळलं आहे. या रक्कमेत आणखी वाढ होईल. या पैशांतून छोटा-मोठा व्यवसाय करू शकतात. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना हे कळणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com