Ladaki Bahin Yojana: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा, लाडकी बहीण योजनेची खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

Jitendra Awhad On Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती प्रसारित करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. मयत शेतकऱ्यांचे वारस, नातेवाईक, शेतकरी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये संभ्रम निर्माण करून नैराश्य पसरवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. संभाजीनगरमधील एका तरुणाने त्यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवून सरकारची बदनामी केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर वाळुंज एमआयडीसी पोलिस त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com