

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. तर काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं असून जाळपोळीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या घटनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शांततेत सुरू असलेलं मराठा आंदोलन भरकटत चाललं आहे. हिंसक घटनेमागे नेमका हात कुणाचा याचा विचार मनोज जरांगे पाटलांनी करावा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक बोलावण्यात आली होती. या समितीनं आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील तपशील सर्वांसमोर मांडला. तसंच मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलं.
त्याचबरोबर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने दाखले दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जातील, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. मराठा समाजाचं (Maratha Reservation) आरक्षण भरकटत चाललं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याचा विचार करावा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गेल्यावेळी मराठा समाजाकडून ५८ मुक मोर्चे काढण्यात आले होते. ते सर्व मोर्चे अत्यंत शांततेत पार पडले.
लाखोंचे मोर्चे काढूनही राज्यातील शांतता, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही. परंतु दुर्दैवाने आज काही ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. मराठा समाजाने सजग होऊन याकडे पाहिले पाहिजे. परंतू आताचं आंदोलन हिंसक होण्यामागे नेमकं कोण? हे शोधायला हवं, टोकाचे पाऊल उचलू नका असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक आवाहन केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सरकारला चिंता आहे. मराठा समाजासाठी त्यांनी जो लढा उभारला आहे तो सरकारने गांभीर्याने घेतला आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.