ज्येष्ठ दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सदर घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या १५ जानेवारी जन्मदिवस हा 'महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस' घोषित करण्याला दुजोरा दिला. (Latest Marathi News)
पुण्यात आज छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, राज्यपाल रमेश बैस, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात अजित पवार यांनी पैलवान खाशाबा जाधव यांची आठवण काढत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पैलवान खाशाबा जाधव हे भाराताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू होते. खाशाबा जाधव यांनी 1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून दिलं होतं.
अजित पवार म्हणाले, 'महाराष्ट्राचे सुपुत्र, ऑलम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा आपण इथे लावलेला आहे. त्यांना आपण सर्वांनी अभिवादन केलंय. खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू होते. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1925 ला झाला होता. त्यांच्या जन्मदिवस महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित करावा'.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'खाशाबा जाधव सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्याचा १५ जानेवारी हा जन्मदिवस दरवर्षी राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल. तसेच क्रीडा पुरस्काराच्या रकमांमध्ये वाढ करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार, जीवनगौरव पुरस्कारासाठी ३ लाख रुपये ऐवजी ५ लाख रुपये देण्यात येईल'.
'तर अन्य क्रीडा पुरस्कारांसाठी १ लाख रुपयांऐवजी ३ लाख रुपये देण्याचे जाहीर करीत आहोत. महाराष्ट्राच्या खेळाडूंना कमी पडून देणार नाही, आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.