
अक्षय बडवे, साम प्रतिनिधी
Devendra Fadnavis News : विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभेला महायुतीने मुसंडी मारत जोरदार विजय मिळवला. मविआला मोठा धक्का बसलेला, जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. तर मनसेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. आता राज्यात महापालिका निवडणुका होणार आहे. मुंबई मनपाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. बीएमसीच्या निवडणुकीत महायुतीसमोर उद्धव ठाकरेंचं आव्हान असेल. भाजप राज ठाकरेंसोबत युती करणार का? याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय.
महापालिका निवडणुकीसाठी महायुती मनसेला सोबत घेणार? या प्रश्नाचे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करूयात.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. महापालिका निवडणुकीत महायुती आणि राज ठाकरे हे कॉम्बिनेशन पाहायला मिळणार का प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. आमच्याकडे त्यांना द्यायला जागा नव्हत्या, कारण आम्ही ३ पक्ष होतो, वस्तुस्थिती लक्षात घेत त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना मतं चांगली मिळाली आहेत, असे म्हणत फडणवीस यांच्याकडून मनसेचे कौतुक करण्यात आले.
राज ठाकरे आणि आमचे विचार मेळ खातात. सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला आनंद आणि रस आहे. महापालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.