Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हानांचा डोंगर, आर्थिक शिस्तीसाठी कोणत्या योजनांना कात्री लावणार?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली... आता फडणवीसांसमोर कोणती आव्हानं असणार आहेत? पाहूयात....या स्पेशल रिपोर्टमधून....

भरत मोहळकर, साम टीव्ही

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस अखेर 5 वर्षानंतर पुन्हा आलेत... फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री बनलेत... मात्र आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद सांभाळताना फडणवीसांसमोर अनेक आव्हानांचा डोंगर असणार आहे..... ही आव्हानं काय आहेत? पाहूयात....

फडणवीसांसमोर आव्हानांचा डोंगर

लाडकी बहीण योजनेचं मानधन 2100 करणं

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं

आर्थिक शिस्त लावून राज्याचं उत्पन्न वाढवणं

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणं

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळवून देणं

मोठे प्रकल्प राज्यात आणून रोजगार निर्मीती करणं

कापूस, सोयाबीनसह शेतमालाला चांगला भाव देणं

नाणार रिफायनरी आणि वाढवण बंदराचं काम पूर्ण करणं

महायुतीतील 3 पक्षांसह छोट्या घटकपक्षांमध्ये समन्वय राखणं

मुंबई महापालिका निवडणुकीतही विजयी घोडदौड कायम राखणं

निवडणुकीत दिलेली आश्वासनं आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात असल्याची विरोधकांची टीका यापार्श्वभुमीवर फडणवीसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी कल्याणकारी योजनांना कात्री लावणार का? तसंच राज्याचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याची नेमक्या काय योजना आखणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com