Devendra Fadnavis : राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis latest Interview : राज ठाकरे महायुतीत सामील होतील का, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.
 Devendra Fadnavis
devendra fadnavissaam
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळालं. महायुतीने २३० जागापर्यंत मजल मारली. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे यंदा विधानभवनात मनसेचा एकही आमदार दिसणार नाही. मनसेने लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढवली. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे आणि महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जिथे शक्य होईल, तिथे सोबत घेऊ, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या मनसेवरही भाष्य केलं. 'मनसेने आम्हाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता. त्यांचा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या लोकांनी निवडणूक लढवल्या नाहीत, तर त्यांचा पक्ष टिकणार कसा? या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांनी चांगले मते घेतली होती. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला जिथे शक्य होईल, तिथे सोबत घेऊ'.

 Devendra Fadnavis
Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट, ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित?

मुंबईच्या विकासकामावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 'मुंबईतील कोणत्याही भागात पोहोचण्यासाठी ५० मिनिटाहून कमी वेळ लागला पाहिजे. याचा आम्ही विचार करत आहोत. मडपासून विरारपर्यंत एक मार्गाचा आम्ही विचार करतोय. पश्चिम भागात एक रिंग रोड तयार करत आहोत. नवी मुंबईत अटल सेतू तयार केलाय'.

 Devendra Fadnavis
Eknath Shinde : 'बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून...'; एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

'मुंबईकरांचे ३ तास प्रवासात जातात. त्यांचा तो वेळ वाचून त्यांना मिळाला पाहिजे. मुंबईत प्रवासाची योग्य सोय करत आहोत. मराठी माणसाला मुंबईत घर मिळालं पाहिजे, याचा आपण विचार केला आहे. पुनर्विकासाचा विचार आम्ही केला. मोठ्या प्रमाणात राहण्याची सोय होणार आहे. अटल सेतूमुळे अनेकांचा मार्ग सुकर झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

 Devendra Fadnavis
Kalyan News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक; आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com