ज्ञानेश कुमार हटवा, SIR याद्या गोठवा; मुंबईतील आंदोलनापूर्वी दिपकेंची मागणी

CJP To Protest Against Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आता CJPच्या रडारवर आलेत. मुंबईत दिपकेंची CJP कुमारांविरोधात जेल भरो आंदोलन करणार आहे. विरोधकांच्या आधी CJP निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. मुंबईसह अन्य राज्यांतही हे आंदोलन होणार आहे का?... CJPची रणनीती काय आहे?...
CJP jail bharo protest against Gyanesh Kumar in Mumbai
CJP jail bharo protest against Gyanesh Kumar in Mumbaisaam tv
Published On: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढा आणखी तीव्र होणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या बैठकांमध्ये रणनीती आखत असताना आता कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP नं कुमारांविरोधात दंड थोपटलेत. ज्ञानेश कुमारांविरोधात CJP संस्थापक अभिजीत दिपके सर्वात आधी थेट मैदानात उतरले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी दिपके 2 ऑक्टोबरला मुंबईत जेलभरो आंदोलन करणार आहेत. एव्हंढच नव्हे तर आंदोलनाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीनं नवी मागणी केलीये. SIR याद्या गोठवून जुन्या मतदार याद्यांवर निवडणुका घेण्याची मागणी दिपकेंनी केलीये.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेणाऱ्या अभिजीत दिपकेंच्या CJPनं ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चेबांधणी सुरू केलीये. आंदोलनापूर्वी मुंबईत येऊन CJPच्या नेत्यांनी आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेतलाय. मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील जेल भरो आंदोलनानंतर देशातील इतर राज्यांतही आंदोलन करण्याचा CJPचा निर्धार आहे. इतकंच नव्हे तर गरज पडल्यास ऑक्टोबरच्या शेवटी जंतर मंतरवर धडकण्याचा इशाराही CJPनं सरकारला दिलाय. शिक्षणव्यवस्थेनंतर आता निवडणूक संस्थेत सुधारणा करण्यासाठी दिपकेंची CJP ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेणार का?... याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com