Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळातून मला कधीही बाहेर काढू शकतात; मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal News Today: मला मंत्रिमंडळातून कधीही बाहेर काढू शकतात, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam TV
Published On

Chhagan Bhujbal Latest News

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत अध्यादेश काढला. या अध्यादेशाला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, असं विधान आमदार गायकवाड यांनी केलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhagan Bhujbal
Sanjay Gaikwad News: संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा; विधानसभा अध्यक्षांकडे कुणी केली मागणी?

त्यांच्या या विधानाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसासह कुणालाही आहे. पण आमदार गायकवाड यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे", असं भुजबळ म्हणाले.

"आमदार संजय गायकवाड (Mla Sanjay Gaikwad) यांनी कमरेत लाथ घालून मला बाहेर काढण्याची भाषा वापरली असली तरी मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. राहिला प्रश्न कमरेत लाथ घालण्याचा तर ते असं करणार नाहीत. मला मंत्रिमंडळातून कधीही बाहेर काढू शकतात", असं विधानही भुजबळ यांनी केलं. (Latest Marathi News)

आमदार संजय गायकवाड काय म्हणाले होते?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात माध्यमांसोबत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी, असं आमदार गायकवाड म्हणाले होते.

मंत्रिपदाची शपथ देताना सर्वांना समान न्याय देण्याचं वचन दिलं जातं. शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात? असा सवाल उपस्थित करताना त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं विधानही आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्याबद्दल केलं होतं.

Chhagan Bhujbal
Mumbai News: मुंबईत मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; वांद्रे परिसरातील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com