

चेंबूर येथे धावत्या शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली.
बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून अनेक विद्यार्थ्यांना दुखापत झाली.
बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलिस आणि संबंधित यंत्रणा दुर्घटनेचा तपास करत आहेत.
मुंबईतील चेंबूर भागातून एक थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळेच्या बसवर अचानक एक झाड कोसळलं आहे. या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले होती. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. बसमधील १० विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यातील एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही दुर्घटना घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले,तरीही एक शाळकरी मुलगा अजूनही बसमध्येच अडकल्याची माहिती आहे. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बसची अस्वस्था पाहून या दुर्घटनेची दाहकता जाणवतेय. अंगावर काटा आणणारे हे दृश्य असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. ही बस चेंबूर टिळक नगर युनिव्हर्सल स्कूलची होती. बसची अस्वस्था पाहून या दुर्घटनेची दाहकता जाणवतेय. अंगावर काटा आणणारे हे दृश्य असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. ही बस चेंबूर टिळक नगर युनिव्हर्सल स्कूलची होती.
दरम्यान बसवरील कोसळलेलं झाड हटवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी प्रयत्न करत आहेत. जेसीबी आणि अत्याधुनिक कटर्सच्या सहाय्याने बसवर कोसळलेला झाडाचा मोठा भाग कापून बाजूला करण्याचे काम केलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.