Chakan Industrial Area: रस्त्यावर उभा कंटेनर ठरला काळ! दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Illegal Parking Of Heavy Vehicles: चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे गावात भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक बसून दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
Chakan container accident latest news
Chakan container accident latest newssaam tv
Published On: 

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे गावात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कामावर जाणाऱ्या दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Chakan container accident latest news
Pradeep Purnekar Case: 5वा आरोपी राजेंद्र शिंदेच; २६ दिवसांनंतर पूर्णेकर हत्या प्रकरणात नवी अपडेट; हॉटेलमधला CCTV व्हिडिओ आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गावातील भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी हा अपघात झाला. सकाळी कामावर जाणाऱ्या दोन तरुणांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही बिगारी कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

Chakan container accident latest news
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याचीच वाट पाहतोय! राज ठाकरेंचे थेट विधान; नेमकं काय म्हणाले?

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कंटेनर आणि इतर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com