ये गारेगार....हार्बर रेल्वेवर १४ एसी लोकल; पनवेल ते मुंबई प्रवास सुखकर, जाणून घ्या वेळापत्रक

Panvel To CSMT AC Local Train Timetable: मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर १४ एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते मुंबई प्रवास अधिक आरामदायी होणार असून २६ जानेवारीपासून सेवा सुरू होणार आहे.
AC Local Train Set Ready for Harbour Line Service at Mumbai Station
AC Local Train Set Ready for Harbour Line Service at Mumbai StationSaam Tv
Published On

मुंबई: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या 26 जानेवारी 2026 पासून हार्बर मार्गावरही एसी लोकल सेवा सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली आहे. ही एसी लोकल मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल दरम्यान धावणार आहे.

सध्या मध्य रेल्वेवर दररोज 1820 लोकल धावत असून त्यापैकी 80 एसी लोकल या मुख्य मार्गावर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान कार्यरत आहेत. आता या सेवेत विस्तार करत हार्बर मार्गावर 14 एसी लोकल सुरू करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील पहिली एसी लोकल सकाळी 4.15 वाजता वाशी ते वडाळा रोड दरम्यान धावेल. त्यानंतर ही लोकल परतीच्या प्रवासाला निघेल. तसेच पनवेल येथून सकाळी 9.09 वाजता सुटणारी एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 10.30 वाजता पोहोचेल.

AC Local Train Set Ready for Harbour Line Service at Mumbai Station
Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

संध्याकाळच्या पीक अवरमध्ये मध्य रेल्वेकडून दोन एसी लोकल चालवण्यात येणार असून, त्यापैकी एक वडाळा रोडवरून तर दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सुटेल. हार्बर मार्गावरील प्रवाशांची एसी लोकलची मागणी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात येत असल्याचे स्वप्निल नीला यांनी सांगितले. सुट्टीचे व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी या एसी लोकल धावणार आहेत.

AC Local Train Set Ready for Harbour Line Service at Mumbai Station
Avinash Jadhav : "₹३०० चा हप्ता घेतात अन्..." व्यवसाय करणाऱ्या मराठमोळ्या तरूणीला डोंबिवलीत त्रास, राज ठाकरेंचा आदेश येताच....

नवी मुंबई ते मुंबई दरम्यान रोज लाखो नागरिक हे लोकलने प्रवास करतात. मागच्या अनेक दिवसांपासून एसी लोकल सुरू व्हावी अशी मागणी प्रवासी करत होते. मुंबईमधील वाढती गरमीमुळे नागरिक आधीच हैराण आहे. आता या प्रवासामुळे नवी मुंबईला जणाऱ्यांचा प्रवास गारीगार होणार आहे. एसी लोकल सुरू होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com