Railway Mega Block : रेल्वेचा मोठा निर्णय! रविवारचा मेगा ब्लॉग रद्द, पण 'या' दिवशी असेल ब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

Central Railway Mumbai Local Mega Block : NEET UG 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक रद्द केला आहे. मात्र २ एप्रिल रोजी मध्यरात्री CSMT ते विद्याविहार आणि ठाणे-वाशी मार्गावर मेगा ब्लॉक राहणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा.
CENTRAL RAILWAY MEGA BLOCK UPDATE: RELIEF FOR NEET UG 2026 STUDENTS, SERVICES AFFECTED ON APRIL 2
CENTRAL RAILWAY MEGA BLOCK UPDATE: RELIEF FOR NEET UG 2026 STUDENTS, SERVICES AFFECTED ON APRIL 2Saam Tv
Published On
Summary
  • NEET परीक्षेमुळे रविवारी मेगा ब्लॉक रद्द

  • २ एप्रिल मध्यरात्री CSMT-विद्याविहार मार्गावर ब्लॉक

  • ठाणे-वाशी/नेरुळ मार्गावरील सेवा बंद

  • काही लोकल गाड्या रद्द, प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करावी

  • रेल्वेने सुरक्षा आणि देखभालीसाठी ब्लॉक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. NEET UG 2026 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. ३ एप्रिल रोजी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. तथापि, विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागात २ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान मेन लाईनवर तसेच ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक जाणून घ्या.

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर रात्री ००.०५ ते पहाटे ०५.०५ वाजेपर्यंत २ एप्रिल रोजी मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री २३.३० ते पहाटे ०४.४७ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहारपर्यंत डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील तसेच पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

CENTRAL RAILWAY MEGA BLOCK UPDATE: RELIEF FOR NEET UG 2026 STUDENTS, SERVICES AFFECTED ON APRIL 2
Cancer : तरुणांमध्ये वाढतोय घसा आणि तोंडाचा कॅन्सर, 'ही' लक्षण दुर्लक्ष करणं पडेल महागात पडेल

घाटकोपर येथून रात्री २३.२९ ते पहाटे ०५.०४ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व त्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

CENTRAL RAILWAY MEGA BLOCK UPDATE: RELIEF FOR NEET UG 2026 STUDENTS, SERVICES AFFECTED ON APRIL 2
Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ या वेळेत दोन्ही मार्गांवरील सेवा पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्याचीही माहिती रेल्वेने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही कामे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, NEET परीक्षेच्या दिवशी दिवसभर कोणताही ब्लॉक नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com