Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे स्थानकात ९ तासांचा मेगा ब्लॉक; दौंडकडे जाणाऱ्या अनेक ट्रेन रद्द

Pune Railway Mega Block News : पुणे रेल्वे स्थानकावर १४ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक लोकल आणि डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
PUNE RAILWAY STATION MEGA BLOCK ON JUNE 14: LOCAL AND DEMU TRAINS CANCELLED, ROUTE CHANGES ANNOUNCED
PUNE RAILWAY STATION MEGA BLOCK ON JUNE 14: LOCAL AND DEMU TRAINS CANCELLED, ROUTE CHANGES ANNOUNCEDSaam tv
Published On
Summary
  • पुणे रेल्वे स्थानकावर १४ जून रोजी ९ तासांचा मेगा ब्लॉक

  • पुणे-तळेगाव लोकल, तळेगाव-पुणे लोकल आणि दोन डेमू गाड्या रद्द

  • काही एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात व मार्गात बदल

  • सुधारित रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवास करा

अक्षय बडवे, पुणे

Pune Railway Mega Block Schedule प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे-दौंड रेल्वे विभागातील विविध तांत्रिक आणि देखभाल कामांसाठी १४ जून रोजी पुणे रेल्वे स्थानकावर तब्बल ९ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून काही लोकल आणि डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा विशेष ब्लॉक लागू राहणार आहे. या कालावधीत पुणे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ आणि ४ हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

PUNE RAILWAY STATION MEGA BLOCK ON JUNE 14: LOCAL AND DEMU TRAINS CANCELLED, ROUTE CHANGES ANNOUNCED
Monsoon Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; २८ जिल्ह्यांना यलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने हा मेगा ब्लॉक अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ब्लॉक दरम्यान इलेक्ट्रिक यंत्रणा, सिग्नल प्रणाली, दूरसंचार व्यवस्था तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) यासंबंधित विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. मात्र, या कामांचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार आहे. अनेक नियमित प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना या ब्लॉकमुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

PUNE RAILWAY STATION MEGA BLOCK ON JUNE 14: LOCAL AND DEMU TRAINS CANCELLED, ROUTE CHANGES ANNOUNCED
Gold Rate Today : सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचा भाव काय ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पुणे – तळेगाव लोकल (९९९०२)

तळेगाव – पुणे लोकल (९९९०३)

बारामती – पुणे डेमू

पुणे – दौंड डेमू

याशिवाय काही एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात तसेच मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com