Eknath Khadse : एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे
Eknath Khadse
Eknath Khadse Saam Tv

Eknath Khadse News : राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली, अशी माहिती भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. (Eknath Khadse News Today)

Eknath Khadse
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे सोपे होणार

एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. या भेटीवर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नचिन्ह उभं करत, खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

आता रक्षा खडसे यांनी सुद्धा एकनाथ खडसे आणि आम्ही अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचं मान्य केले आहे. आम्ही अमित शाहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, मात्र शाह यांच्या व्यस्त कामामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ खडसेंची केवळ फोनवर चर्चा झाली, असं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे. (Eknath Khadse Todays News)

Eknath Khadse
Mumbai : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर शिवसैनिक संतापले; चेंबूरमध्ये बॅनर फाडण्याचा प्रयत्न

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत असताना, माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला, असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले संबंध नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. याबाबत रक्षा खडसे यांना विचारलं असता, आपल्याला काहीही माहिती नाही. ते राष्ट्रवादीत आहेत, तर मी भाजपमध्ये, असं सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com