Mumbai : नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर शिवसैनिक संतापले; चेंबूरमध्ये बॅनर फाडण्याचा प्रयत्न

चेंबूरमध्ये शिवसैनिक केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले.
mumbai news
mumbai news saam tv
Published On

Shivsena News : मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला दसरा मेळावा घेण्याला परवानगी मिळाली आहे. याचदरम्यान, शिवसैनिक केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि रामदास कदम यांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंबूरमध्ये काहीकाळ तणाव पाहायला मिळाला.

mumbai news
Shivsena Latest News: शिवाजी पार्कात ठाकरेंचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये बुधवारी शिवसेनेची सभा झाली. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असा इशारा देत ठाकरे यांनी काल झालेल्या मेळाव्यात भाजपसह शिंदे गटावर तोफ डागली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला.

'शिंदे गटातील आमदार किंवा भाजपातील कुठल्याही आमदारांच्या केसाला धक्का जरी लागला, तरी उद्धव ठाकरे यांना राज्यात फिरू देणार नाही, असं वक्तव्य नारायण राणे यांनी काल केलं होतं. नारायण राणेंच्या त्या वक्तव्यानंतर चेंबूरमध्ये शिवसैनिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

चेंबूरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केले. तसेच शिवसैनिकांनी दोन्ही नेत्यांचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव पाहायला मिळाला.

mumbai news
मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'कायदा व्यवस्थेची जबाबदारी...'

काय म्हणाले होते नारायण राणे ?

'भावना गवळींबद्दल बोलताना जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शिंदे-गट भाजपच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही. उद्धव ठाकरेंनी आयुष्यात तलवार कधी पकडले का? मोदी अमित शहा नेहमी महाराष्ट्राला मदत करतात. ठाकरेंनी आयुष्यात मर्दासारखं काम केलं नाही. मोदींचं नाव घेवू नका, तुम्हाला जड जाईल, ठाकरे मोदींच्या नखाएवढेही नाहीत. वाकड्या नजरेनं बघाल तर महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. ठाकरेंनी नैराश्यातून कालच्या मेळाव्यात भाषण केलं. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे, अशा कठोर शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com