Kalyan Bus Accident: कल्याणमध्ये खासगी बस उलटली; अपघातामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ

Kalyan Bus Accident: आज राज्यभरात बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याणमधूनही अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे.
Kalyan Bus Accident
Kalyan Bus AccidentSaam tv

अभिजीत देशमुख

Kalyan News: आज राज्यभरात बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याणमधूनही अपघाताचं मोठं वृत्त हाती आलं आहे. कल्याणमध्ये खासगी बस उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात उलटल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल परिसरातील ही घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये बस (Bus) उलटल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या पश्चिमेकडील गोदरेज हिल परिसरात खासगी बस उलटल्याची घटना घडली. ही बस कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात उलटली आहे.

Kalyan Bus Accident
Nashik Bus Accident: पुण्याहून निघालेल्या एसटी बसला अपघात, मनमाडमध्ये प्रवाशांनी भरलेली भरधाव बस उलटली

खासगी बस उलटल्याने वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत बस चालक जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर (Accident) परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

नेमका अपघात कसा झाला?

बसचा ब्रेकफेल होऊन सोसायटीची संरक्षक भिंत तोडून थेट वाहनांवर कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील परिसरात घडली. यामध्ये बस चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. तसेच अपघातस्थळी एकही व्यक्ती नसल्याने मोठा अनर्थ टळला.

कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. आज संध्याकाळी गोदरेज हिलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले. त्यानंतर खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून ही बस सोसायटीमध्ये उभे असलेल्या तीन गाड्यांवर कोसळली.

Kalyan Bus Accident
Pune Accident News: नववधूला आधी डंपरने धडक दिली, नंतर टँकरने चिरडलं; भीषण अपघाताचा थरकाप उडवणारा Video

बसचे ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला असून सोसायटीतील 3 गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र या या दुर्घटनेत बस चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आले. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नव्हते, तर अपघातस्थळी एकही जण नसल्याने जीवितहानी झाली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com