>>निलेश बोरुडे
Accidental Death of a Newly Married Women: ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली, त्यामुळे रस्तावर पडलेल्या नवविवाहितेला समोरून येणाऱ्या टँकरने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेत नववधूचा जागीच मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ रामेश्वर पतसंस्थेच्या समोर ही घटना घडली आहे. शिवाणी शैलेश पाटील (वय २४ रा. स्वप्नपूर्ती हाइट्स, किरकटवाडी ता. हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाणी पाटील या आपल्या पतीसह दुचाकीवरून कामाला निघाल्या होत्या. किरकटवाडी फाट्याजवळील रामेश्वर पतसंस्थेच्या समोर वाहनांची वर्दळ असताना मागून आलेल्या अवजड डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर शिवाणी पाटील पतीसह रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी समोरुन आलेल्याय पाण्याच्या टॅंकरचं चाक शिवाणी पाटील यांच्या डोक्यावरुन गेले.
या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर आणि टॅंकर दोन्ही वाहनांचे चालक वाहनं घेऊन पसार झाले. या दोन्हीही वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.
डंपर आणि टॅंकरची रोजचीच घाई
नांदोशी येथील दगड खाणींतून अवजड वाहतूक करणारे डंपर नियम डावलून भरधाव वेगाने किरकटवाडी व मुख्य सिंहगड रस्त्यावरुन ये-जा करत असतात. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत मात्र प्रशासन काहीही कारवाई करताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. (Accident News)
एकेक सोसायटी पाण्यासाठी दरमहा लाखो रुपये मोजत आहे आणि त्यामुळे टॅंकर चालकही रस्त्यावरील इतरांची पर्वा न करता भरधाव वेगाने 'टार्गेट' पूर्ण करण्यासाठी टॅंकर पळवत आहेत. डंपर आणि टॅंकरची ही रोजचीच स्पर्धा अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. (Pune News)
भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सीसीटीव्ही कॅमेरऱ्यातील दृश्यांनुसार नांदेड फाट्याकडून एक दुचाकी जयप्रकाश नारायण नगरकडे वळण्यासाठी विरूद्ध बाजूने आल्याने डंपर चालकाने अचानक डंपार उजवीकडे घेतला. त्याच वेळी ओव्हरटेक करत असलेल्या दुचाकीला डंपरचा जोरात धक्का लागला आणि दुचाकीवरील नवविवाहिता खाली पडली. समोरुन येत असलेल्या टॅंकरचे चाक थेट डोक्यावरून गेल्याने नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi news)
Edited By - Chandrakant Jagtap
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.