Mukesh Ambani gifted a house worth Rs 1500 crore to an employee: बहुतांश कंपन्यांमध्ये सध्या इंक्रीमेन्टचा काळ सुरू आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढीची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तुमच्या कंपनीच्या मालकाने तुम्हाला एखादं आलिशान घर भेट दिलं तर? कदाचित सुरुवातीला तुम्हाला तुमच्या नशिबावर विश्वास बसणार नाही.
पण आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी त्यांचे सर्वात जुने कर्मचारी आणि मित्र मनोज मोदी यांना तब्बल 1500 कोटी रुपयांची आलिशान 22 मजली इमारत गिप्ट दिली आहे.
प्राइम लोकेशनला आहे घर
अंबानींच्या या गिफ्टमुळे त्यांनी सिद्ध केले आहे की, ते केवळ मोठे उद्योगपतीच नाहीत तर त्यांचं मन देखील खूप मोठं आहे. मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी मुकेश अंबानी यांच्या खूप जवळचे असून कंपनीच्या प्रगतीत त्यांचा मोठा हात आहे.
मुकेश अंबानी यांनी मनोज मोदींना (Manoj Modi) भेट दिलेली 22 मजली इमारत मुंबईतील एका प्रिमियम ठिकाणी आहे. ही इमारत मुंबईतील नेपियन सी रोडवर आहे. नुकतेच त्यांनी मनोज मोदी यांना ती इमारत गिप्ट केली आहे. या मालमत्तेला वृंदावन असे नाव देण्यात आले आहे.
अंबानींच्या यशामागे मनोज मोदींचा हात
मनोज मोदी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे संचालक म्हणून दीर्घकाळ काम करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या जवळच्या लोकांमध्ये मनोज मोदींचा समावेश आहे. रिलायन्सच्या सर्व व्यावसायिक करारामागे मनोज मोदींचा मोठा हात आहे. मुकेश अंबानींनी भेट दिलेली इमारत १.७ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधलेली आहे. तेथील सध्याच्या दर 45,100 रुपये प्रति चौरस फूट ते 70,600 रुपये प्रति चौरस फूट आहेत. (Mumbai News)
कोण आहेत मनोज मोदी ?
लाइमलाइटपासून दूर राहणारे मनोज मोदी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नसतात. हजिरा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम बिझनेस, रिलायन्स रिटेल इत्यादी बहुतेक प्रकल्पांशी ते संबंधित आहेत. सत्तेच्या बाबतीत त्यांच्याकडे सीईओइतकेच अधिकार आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.