Pahalgam Terror Attack: धर्म विचारला, कलमा वाचायला लावला; त्यानंतर धाडधाड गोळ्या झाडल्या, मुलीसमोर दहशतवाद्याने घेतला बाप अन् काकाचा जीव

Jammu-Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला. मुलीच्या डोळ्यासमोरच वडिलांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. आसावरी जगदाळे यांनी या घटनेचा धक्कादायक थरार सांगितला.
Pahalgam Terror Attack: धर्म विचारला, कलमा वाचायला लावला; त्यानंतर धाडधाड गोळ्या झाडल्या, मुलीसमोर दहशतवाद्याने घेतला बाप अन् काकाचा जीव
Pahalgam Terror AttackSaam Tv
Published On

जम्मू आणि काश्मिरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील २ व्यवसायिकांचा मृत्यू झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोन जिवलग मित्रांवर गोळ्या झाडून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. गोळ्या लागल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले होते. पण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या डोळ्यादेखतच संतोष जगदाळे यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. आसावरी जगदाळे यांनी या हल्ल्यादरम्यान नेमकं काय घडलं? याचा थरार सांगितला. 'दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांनाच लक्ष्य केले आणि सर्वांना त्यांचा धर्म विचारून मारले.', असे आसावरी जगदाळे यांनी सांगितले.

पुण्यातील एका कंपनीत आसावरी जगदाळे एचआर म्हणून काम करते. आसावरीसोबत तिचे वडील संतोष जगदाळे, आई प्रगती जगदाळे, त्याचसोबत काका कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गनबोटे हे काश्मिरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आले होते. यामधील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. जगदाळे कुटुंबीय पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहत होते. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत राहत होते. वडील आणि काकांना गमावल्यामुळे आसावरीसोबत त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आसावरी, त्यांच्या आई आणि काकी या सुखरूप आहेत.

Pahalgam Terror Attack: धर्म विचारला, कलमा वाचायला लावला; त्यानंतर धाडधाड गोळ्या झाडल्या, मुलीसमोर दहशतवाद्याने घेतला बाप अन् काकाचा जीव
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू, राज्यभरात हळहळ

आसवारी हल्ल्याचा थरार सांगताना म्हणाल्या की, 'हल्ला झाला तेव्हा त्याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. दहशतवाद्यांनी विशेषतः पुरुषांना लक्ष्य केले. दहशतवादी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारत होते आणि हिंदू असलेल्यांना मारत होते.' आसवारी यांनी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्या म्हणाल्या की, 'आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो त्याठिकाणी स्थानिक पोलिसांसारखे कपडे घातलेले काही लोकं गोळीबार करत आमच्याकडे येत होते. त्यांना पाहून आम्हाला भीती वाटली. स्वतःला वाचवण्यासाठी आम्ही जवळच्या तंबूत गेलो. इतर ६ ते ७ पर्यटकही आमच्यासोबत होते. गोळी लागू नये यासाठी आम्ही सर्वजण जमिनीवर झोपलो. सुरुवातीला आम्हाला वाटले की हा गोळीबार सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये होत आहे. त्यानंतर दहशतवाद्यांचा एक गट जवळच्या तंबूत आला आणि त्यांनी गोळीबार केला.'

Pahalgam Terror Attack: धर्म विचारला, कलमा वाचायला लावला; त्यानंतर धाडधाड गोळ्या झाडल्या, मुलीसमोर दहशतवाद्याने घेतला बाप अन् काकाचा जीव
Pahalgam Terror Attack: आता बस्स झालं, भारत-पाक क्रिकेट नकोच! दोन्ही देशांमधील क्रिकेटवर बंदी आणण्याची माजी खेळाडूची मागणी

आसावरी यांनी पुढे सांगितले की, 'यानंतर ते आमच्या तंबूत आले. माझ्या वडिलांना बाहेर येण्यास सांगितले. यानंतर दहशतवादी म्हणत होते की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देता. यानंतर तो म्हणत होता की काश्मिरी अतिरेकी निष्पाप लोकांना, महिलांना आणि मुलांना मारत नाहीत. मग त्याने माझ्या वडिलांना कलमा वाच सांगितले. जेव्हा ते वाचू शकले नाही तेव्हा त्यांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या डोक्यात, एक कानाजवळ आणि एक पाठीत लागली. माझे काकाही माझ्या शेजारी उभे होते. दहशतवाद्यांनी त्याच्यावर ४ ते ५ गोळ्या झाडल्या. त्याठिकाणी दहशतवाद्याने बऱ्याच पुरुषांनाही मारले. तिथे मदत करायला कुणीच नव्हते. त्याठिकाणी पोलिस किंवा सैन्य नव्हते. २० मिनिटांनी जवानांची टीम तिथे पोहोचली. अशावेळी दहशतवाद्यांच्या भीतीमुळे स्थानिक लोकही कलमाचे पठण करत होते.'

Pahalgam Terror Attack: धर्म विचारला, कलमा वाचायला लावला; त्यानंतर धाडधाड गोळ्या झाडल्या, मुलीसमोर दहशतवाद्याने घेतला बाप अन् काकाचा जीव
Pahalgam Terror Attack: गोळीबारात मृत पावलेल्या मंजुनाथचा अखेरचा व्हिडिओ Viral; हल्ल्याच्या आधीच केलं होतं शूट

दरम्यान, या हल्ल्यात आसावरीचे वडील आणि काका मारले गेले. परंतु त्यांच्यासोबत असलेल्या महिला बचावल्या. स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलांनी त्याला वाचवले. पहलगाममधील हल्ल्यात एकूण २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बंगाल, बिहार, गुजरात, कर्नाटकसह अनेक राज्यांतील लोकांचा समावेश होता. लग्नानंतर कुटुंबासह हनिमूनला गेलेले अनेक पर्यटक त्याठिकाणी होते. कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत क्षणात होत्याचे नव्हते झाले.

Pahalgam Terror Attack: धर्म विचारला, कलमा वाचायला लावला; त्यानंतर धाडधाड गोळ्या झाडल्या, मुलीसमोर दहशतवाद्याने घेतला बाप अन् काकाचा जीव
Pahalgam Terror Attack : मुलाची दहावीची परीक्षा झाली म्हणून कुटुंबासोबत फिरायला गेले, अन् परतलेच नाहीत, डोंबिवलीत शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com