कल्याण येथील तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. कल्याणमधील नेवाळी येथे मंगळवारी एका मराठी रिसेप्शनिस्टला परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली. या मारहाणीनंतर ही तरुणी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून तिला पॅरालिसिस होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. या घटनेतील गुन्हेगार गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत झा या दोघांनाही मनसे कल्याण उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे यांनी अंबरनाथच्या नेवाळी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान गोकुळ झा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे
कल्याण येथील नांदिवली परिसरातल्या एका खाजगी रुग्णालयात गोकुळ झा नावाच्या तरुणानं रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केली या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. संबंधित डॉक्टरांकडे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते. त्यामुळे उपस्थित रिसेप्शनिस्टने गोकुळ झा नावाच्या तरुणाला बाहेर वाट पाहण्यास सांगितलं.
पण गोकुळ जबरदस्तीनं डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रिसेप्शनिस्टनं त्याला आत जाण्यापासून अडवलं असता त्या तरुणानं तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिचे केस धरून तिला फरफटत घेऊन गेला. या मारहाणीत तिचे कपडे फाटले आणि तिला जबर दुखापत झाली. या प्रकरणानंतर संबंधित तरुणीला उपचारांसाठी जवळच्या जानकी रुग्णालयात हलवण्यात आलं.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मराठी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संदर्भात जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोईन शेख म्हणाले, "तिच्या मानेवर जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे. तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. तसेच तरुणीला मान हलवताना खूप त्रास होत आहे. आणि या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे. संबंधित तरुणीला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे."
कल्याण येथील नांदिवली परिसरामध्ये तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झाला मनसेचे उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे आणि दीपक करांडे यांनी नेवाळी परिसरांमधून आरोपीला ताब्यात घेऊन मनसे स्टाईलने मारझोड देखील केल्याची माहिती योगेश यांनी दिली. गोकुळ झाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले असून गोकुळ झाचा भाऊ रंजीत झा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
आज कल्याण न्यायालयात या आरोपींना हजर करण्यात येणार आहे. दरम्यान गोकुळ झा हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्याकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.