
कल्याणमध्ये खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीवर गुंड प्रवृत्तीच्याा तरुणाने लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या आरोपीबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिलीय. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत तरुणीच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याच्या नावावर तीन गुन्हे दाखल आहेत. रंजीत झा गोकुळच्या भावाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर गोकूळ झा याला शोधण्यासाठी ५ टीम तयार करण्यात आल्या आहेत. गोकुळ कुठे कुठे जावू शकतो याचा आढावा घेऊन टीम तिथे रवाना केल्या गेल्या आहेत. गोकुळ रेकॅार्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आल्याने तिच्या मानेला आणि छातीला इजा झाली होती. आता पोलिसांनी गोकुळ हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती दिली. कल्याण कोळशेवाडी , मानपाडा आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करणे धारधार हत्यार वापरणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पाच दिवसाआधी कल्याण कोळशेवाडीत एका ट्रक चालकाला मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. कल्याण पोलीस अधिक तपास करत आहे.
तरुणीला मोठ्या प्रमाणात इजा झालीय. छातीत पायात पैसे ठिकाणी जास्त लागलं असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलीय. सध्या डॉक्टरांकडून उच्चार सुरू आहेत. एक्स-रे आणि ब्लड आणि इतर चाचण्या केल्यानंतर किती जखमा आहेत आणि किती गंभीर आहेत हे समजल्यानंतर त्या पद्धतीचा उच्चार देखील केला जाईल अशी माहिती डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांनी दिलीय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पोलीस स्टेशनला जाऊन याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली.पोलिस तपास करत आहेत. झालेली घटना अंत्यंत दु्र्दैवी आहे, आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. पोलीस यंत्रणेने या घटनेची सखोल चौकशी करावी. तसेच जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी. घटना का झाली याचाही मागोवा घ्यावा. पोलिसांकडे सर्व घटनेचे फुटेज आले आहेत. त्यामुळे आधी काय घडलं हे देखील तपासलं गेलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं रवींद्र चव्हाण म्हणालेत.
दरम्यान या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतलीय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि पीडित तरुणीच्या घरी जाऊन तिची भेट घेत उपचाराच्या खर्चाची जबाबदारी घेण्याचं आश्वासनही दिले. "मुलीची शारीरिक अवस्था पाहून संताप अनावर होतो. छाती, पाठ, पायावर मारहाण झालीय. तिला तातडीने रुग्णालयात भरती करणं गरजेचं आहे.
तिची स्थिती गंभीर असून ती कालपासून तशीच आहे, कपडेही बदललेले नाहीत.", असे अविनाश जाधव म्हणालेत. दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी तरुणीची रुग्णालयात भेट घेतली. डॉक्टर व नातेवाईकांकडून तिच्या प्रकृतीची माहिती घेत घडलेल्या प्रकारही ऐकून घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.