Mumbai Local Accident: बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवली, नेहमीप्रमाणे कामाला निघाला, लोकल अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला

Mumbai Local Accident Mumbra diva station: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातामध्ये ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये २८ वर्षीय राहुल गुप्ता या तरुणाचा देखील मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Mumbai Local Accident:  बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवली, नेहमीप्रमाणे कामाला निघाला, लोकल अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला
Mumbai Local AccidentSaam Tv
Published On

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातामध्ये ४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ९ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये मुंब्रामध्ये राहणारा राहुल गुप्ता या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल घरात एकुलता एक कमावता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यची बातमी कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. राहुल बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी प्रचंड मेहनत करत होता.

राहुल गुप्ता हा तरुण २८ वर्षांचा होता. राहुल हा दिवा येथील साबेगाव यशोदानगर येथे चाळीत राहत होता. चार जणांच्या कुटुंबामध्ये तो एकटा कमवणारा होता. राहुल मुंबईतील एका स्टेशनरीच्या दुकानामध्ये काम करत होता. राहुल सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी निघाला. नेहमीच्या लोकलमध्ये तो चढला खरा पण गर्दी असल्यामुळे तो लोकलच्या दारात उभा राहूनच प्रवास करत होता. तेवढ्यात लोकलला अपघात झाला आणि राहुलचा हात सुटून तो रेल्वे रूळावर पडला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुलचा मृत्यू झाला.

Mumbai Local Accident:  बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवली, नेहमीप्रमाणे कामाला निघाला, लोकल अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला
Mumbai Local Accident: मुंब्रा-दिवादरम्यानची घटना दुर्दैवी, अपघातामुळे मी व्यथित; दुर्घटनेवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

राहुलच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना मोठा धक्का बसला. रडून रडून त्यांचे बेहाल झाले आहे. राहुलच्या घरात त्याचे आई-वडील, दोन लहान बहिणी आहेत. राहुलला त्याच्या बहिणीचे लग्न करायचे होते. यासाठीच तो प्रचंड मेहनत घेत होता. घरात राहुल एकटाच कमावत होता. त्यामुळे राहुलच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्याच्या मित्रांनी केली आहे.

Mumbai Local Accident:  बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवली, नेहमीप्रमाणे कामाला निघाला, लोकल अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला
Mumbai Local: १,२,३,४,५,६... मुंब्रा स्थानकावर मृतदेहाचा खच, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

दरम्यान, आज सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळणावर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या दोन लोकल एकाच वेळी जवळ आल्या. त्यामुळे लोकलमधील काही प्रवाशांच्या बॅगा दुसऱ्या लोकलला घासल्या गेल्या. यावेळी धावत्या लोकलमधून अनेक प्रवासी रेल्वे रूळावर पडले. या अपघातामध्ये फक्त पुरूषच नाही तर महिला देखील जखमी झाल्या. कुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर कुणाचा हात तर कुणाचा पाय तुटला. या सर्व जखमींवर सध्या कळव्यातील सरकारी रुग्णलाय आणि ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सूरू आहेत.

Mumbai Local Accident:  बहिणीच्या लग्नासाठी पै पै जमवली, नेहमीप्रमाणे कामाला निघाला, लोकल अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला
Mumbai Local: मुंब्रा - दिवा लोकल अपघातात ५ जणांचा हकनाक बळी; रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com