Death News : शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रशांत काळे यांचे निधन, कल्याणमध्ये राजकीय वर्तुळात शोककळा

Shivsena Prashant Kale Death News : शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. १६ महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Prashant Kale Death News
Prashant Kale Death News AI Image
Published On: 
Summary
  • शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे यांचे निधन

  • जवळपास १६ महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते

  • मंगळवारी प्रकृती खालावल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Eknath Shinde Shivsena Kalyan Leader Prashant Kale Death News शिवसेनेच्या कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे यांचे मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. प्रशांत काळे जवळपास १६ महिन्यांपासून एका आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी माधुरी काळे या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेविका आहेत.

प्रशांत काळेंवर रुग्णालयात १६ महिन्यांपासून उपचार

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत काळे जवळपास १६ महिन्यांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर कल्याणमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ते कोमात होते. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Prashant Kale Death News
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! दुचाकींच्या धडकेत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये शिक्षकांचा समावेश

काळे यांची राजकीय कारकीर्द

प्रशांत काळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. काही काळ त्यांनी शिवसेनेतही काम केले आणि पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते सक्रिय होते. विविध राजकीय पक्षांमध्ये काम करताना त्यांनी आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा उमटविला होता. मनमिळाऊ स्वभाव आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे प्रशांत काळे यांचा कल्याण-डोंबिवली परिसरात मोठा परिचय होता. राजकीय कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले होते. कल्याण-डोंबिवलीसह परिसरातील विविध भागांत त्यांचा जनसंपर्क होता.

Prashant Kale Death News
Face Shaving : फेस शेविंगमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस जाड येतात? डर्मेटोलॉजिस्ट काय सांगतात?

राजकीय वर्तुळात शोककळा

काळे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि विविध मान्यवरांनी त्यांच्या घरी भेट दिली. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. प्रशांत काळे यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी सोन्याची वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com