Badlapur School Case : मोठी बातमी! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Badlapur School Case Update: बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 26 तारखेपर्यंत कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरण! मुख्य आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
Badlapur minor school girl abuseSaam Tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २१ ऑगस्ट २०२४

बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला 26 तारखेपर्यंत कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कल्याण न्यायालयामध्ये आरोपीला हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरण! मुख्य आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
Pune News: ब्रेकिंग! मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक; १६ तासांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर शाळेमधील शिपाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (वय, २४) याला पोलिसांनी अटक केली होती. आज त्याला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने आरोपीला २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नराधम आरोपीला पोलीस कोठडी

आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. मुलींना आरोपी काय बोलायचा? कसा न्यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने 26 तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरण! मुख्य आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
Nagpur Police : अरे चाललंय काय? पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्यांचा डाव; जुगार खेळतानाचा पोलिसांचा VIDEO व्हायरल

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मोठी घोषणा

दरम्यान, बदलापूरमधील धक्कादायक घटनेनंतर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा असे आदेश मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. शैक्षणिक संस्थेत आत्मरक्षणासाठी अभियान सुरु करा, शैक्षणिक संस्थांमधील चालक, वाहक, कँटीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करा, महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घ्या, अशाही सूचना त्यांनी दिले आहेत.

Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरण! मुख्य आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
Pune Crime: स्वातंत्र्य दिनालाच अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com