Mumbai News: ...आधी मैत्री करतो, नंतर लुटतो आणि पळून जातो; 100 जोडप्यांची फसवणूक करणाऱ्याला अटक

Latest News: दिल्लीतील (Delhi) काश्मीर गेट (Kashmir Gate) येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Borivali Police
Borivali PoliceSaam Tv
Published On

Mumbai Crime News: पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या जोडप्यांचा विश्वास संपादन करून नंतर त्या जोडप्यांचे मोबाईल चोरून बँक खात्याचे (Bank Account) तपशील घेऊन खात्यातील लाखो रुपये काढून घेणाऱ्या आरोपीला मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी (Borivali Police) अटक केली आहे. अनुराग राजेश ठाकूर असं या आरोपीचे नाव असून त्याला दिल्लीतील (Delhi) काश्मीर गेट (Kashmir Gate) येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 2 मोबाईल फोन आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

Borivali Police
Mumbai Crime News : मुंबईत शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 31 लाखाची फसवणूक, तिघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे एक जोडपे काश्मीर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी अनुराग ठाकूरसोबत त्यांची ओळख झाली. अनुरागने त्यांच्याशी मैत्री केली. एकत्र फिरुन त्यांचा विश्वास जिंकला. काही दिवसांनी अनुराग मुंबईला आला. त्याने जोडप्याला फोन करून सांगितले की मुंबईत माझे कोणीच नातेवाईक नाहीत. म्हणून या जोडप्याने आरोपी अनुरागला त्यांच्या घरी राहू दिले.

Borivali Police
Pune Crime News: सुसंस्कृत पुण्यात विकृतीचा कळस! फुटपाथवर राहणाऱ्या भिकारी महिलेवर अत्याचार; रात्री लघुशंकेसाठी गेली अन्...

काही दिवस एकत्र राहिल्यानंतर अनुराग ने या दाम्पत्याच्या घरातून पहिला मोबाइल चोरला. त्याने या मोबाइलमधील सेव्ह बँक डिटेल्सची माहिती काढून जोडप्याच्या खात्यातून 80 हजार रुपये काढून घेतले. आपल्या बॅक अकाऊंटमधून पैसे गेल्याची माहिती कळताच या जोडप्याने बोरिवली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तांत्रिक तपास करत असताना पोलिसांनी आरोपीला दिल्लीतील काश्मीर गेट येथून अटक केली.

Borivali Police
Wrestlers Protest: आमची तेवढी पात्रता नाही का? क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट नाराज

या प्रकरणाचा तपास करत असताना असे समोर आले की, आरोपी अनुराग हा त्यांच्या परिचयातला आहे. आरोपी देशभरातील पर्यटनस्थळांवर अशाप्रकारे फिरत असतो. तो जोडप्यांना शिकार बनवून त्यांच्याशी मैत्री करतो, नंतर त्यांना लुटतो आणि पळून जातो. अनुरागने आतापर्यंत अशाप्रकारच्या शेकडो लोकांना आपला जाळ्यामध्ये अडकवले आहे. सध्या बोरिवली पोलिस अनुराग ठाकूरचा मोबाईल स्कॅन करत असून त्याने आतापर्यंत किती लोकांचा गंडा घातला आहे याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com