BMC: सहा महिन्यांत नव्या गाड्या, BMCत उधळपट्टी; पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी

BMC Office-Bearers Want Innova Car: पंतप्रधान मोदींनी केलेलं खर्च कमी करण्याचं आव्हान त्यांच्याच पक्षाचे नेते विसरत चालल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ६ महिन्यांपूर्वी घेतलेल्या स्कॉर्पिओ नकोशा झाल्या आहेत. नेमकी काय अडचण आहे या भाजप पदाधिकाऱ्यांची? स्कॉर्पिओच्या बदल्यात कोणती गाडी या नेत्यांनी हवीय? पाहूयात हा रिपोर्ट.
BMC Office-Bearers Want Innova Car
BMC Office-Bearers Want Innova Carsaam tv
Published On

आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असं बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीत लवकरच खडखडाट होण्याची शक्यताये. कारण, बीएमसीतल्या पदाधिकाऱ्यांच्या अचानक उफाळून आलेल्या पाठदुखीवर आता मुंबईकरांच्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. केवळ ६ महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ब्रँड न्यू स्कॉर्पिओ गाड्यांनी म्हणे या नेत्यांना पाठदुखी सुरु झालीये आणि याच पाठदुखीचं कारण पुढे करत या पदाधिकाऱ्यांनी थेट २५ लाखांच्या अलिशान पाठदुखी फ्री इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी केलीये, आता नक्की कोणाकोणाला या स्कॉर्पिओने पाठदुखीचा झटका दिलाय? पाहा.

कोणाला हवी इनोव्हा?

उपमहापौर

सभागृह नेते

स्थायी समिती अध्यक्ष

शिक्षण समिती अध्यक्ष

सुधार समिती अध्यक्ष

सहा विशेष समित्यांचे अध्यक्ष

BMC Office-Bearers Want Innova Car
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी संकट! पुढील २ दिवस १५ टक्के अतिरिक्त पाणीकपात लागू; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुंबई महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य केलंय. तर भाजपनं राऊतांवर पलटवार केलाय. खुद्द महापौरांनी उधळपट्टीचं समर्थन केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या अजब मागणीचे धिंडवडे काढत थेट दुकानात जाऊन ६ गाड्यांची खरेदी करून महापालिकेच्या दारात पाठवण्याची घोषणा करत त्यांची खिल्ली उडवीलेय.

BMC Office-Bearers Want Innova Car
मुंबईत होतोय देशाचा पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?

२०२२ मध्ये लाँच होताच अवघ्या ३० मिनिटांत १ लाख गाड्यांच्या बुकिंगचा ऐतिहासिक विक्रम या कारने केलाय. आज देशात साडेचार लाखांहून अधिक लोक हीच गाडी चालवतायत. मग प्रश्न असाये की, ज्या गाडीने देशातील लाखो लोकांची मनं जिंकली, तिने केवळ बीएमसीच्याच पदाधिकाऱ्यांची पाठ का मोडली? मुंबईतल्या मुंबईत फिरताना या नेत्यांची पाठ नक्की गाडीमुळे दुखतेय, की रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे? २५ लाखांच्या अलिशान इनोव्हा मागणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी गाडी बदलण्यापेक्षा, आधी मुंबईतले रस्ते सुधारून खड्डे बुजवलेत तरी गाड्या बदलण्याची वेळ येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com