उद्धव ठाकरेंचे शिलेदार 'शिंदे' यांच्या घरावर चालणार महापालिकेचा बुलडोझर? मोठी खळबळ

Bmc Demolition Notice Thackeray Sena Corporator: गोरेगाव प्रभाग क्रमांक ४० मधील ठाकरे गटाचे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या संतोष नगरमधील घरावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाईची नोटीस बजावली आहे.
BMC DEMOLITION NOTICE TO THACKERAY SENA CORPORATOR
BMC DEMOLITION NOTICE TO THACKERAY SENA CORPORATORsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: गोरेगाव प्रभाग क्रमांक ४० मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिंडोशी येथील संतोष नगर परिसरातील त्यांच्या घरावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली असून, संभाव्य तोडक कारवाईसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणीही केली आहे. त्यामुळे आता नगरसेवक शिंदे यांच्या घरावर महापालिकेचा बुलडोझर चालणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

BMC DEMOLITION NOTICE TO THACKERAY SENA CORPORATOR
कोर्टाच्या निकालाआधी ठाकरे- शिंदेंमध्ये मनोमिलन होणार? राजकारणात खळबळ

दिंडोशी मनपा वसाहत, संतोष नगर परिसरात तुळशीराम शिंदे यांचे १४ फुटांपेक्षा अधिक उंचीचे घर असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या घराच्या बांधकामाविरोधात प्रभाग क्रमांक ४० मधील भाजपचे पराभूत उमेदवार संजय आव्हाड यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती. झोपडपट्टी परिसरात नियमांचे उल्लंघन करून अधिक उंचीचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. तसेच नगरसेवक पदाचा गैरवापर करून हे घर बांधण्यात आल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

BMC DEMOLITION NOTICE TO THACKERAY SENA CORPORATOR
Maharashtra Politics : ६ महिन्यात सत्ता उलटून टाकू, शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा

या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने तुळशीराम शिंदे यांच्या घरावर कारवाई करण्यासाठी ३ तारखेची नोटीस जारी केली आहे. संभाव्य तोडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, भाजपकडून करण्यात आलेले आरोप नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी फेटाळले आहेत. आपले घर १९८० ते १९८५ या कालावधीत बांधण्यात आले असून, ते नवीन बांधकाम नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय संतोष नगर परिसरात त्यांच्या घराइतकीच उंची असलेली चार ते पाच हजार घरे असल्याचेही त्यांनी सांगितले.

BMC DEMOLITION NOTICE TO THACKERAY SENA CORPORATOR
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? शिंदेंच्या आमदाराच्या त्या विधानामुळे राजकारणात खळबळ; म्हणाले, "राजकारणात काहीही..."

महापालिकेला कारवाई करायचीच असेल, तर केवळ आपल्या घरावर कारवाई न करता परिसरातील अशा सर्व घरांवर समान पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. एकीकडे भाजपकडून अनधिकृत बांधकामाचा आरोप करून कारवाईची मागणी करण्यात येत असताना, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नगरसेवकाने जुन्या बांधकामाचा दाखला देत कारवाईला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संतोष नगरमधील या घराच्या कारवाईवरून भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता महापालिका प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करते की या प्रकरणात आणखी काही घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.