BJP vs Congress: भाजप नेत्याचं वक्तव्य खुपलं, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; हातापायाला धरून पोलीस व्हॅनमध्ये भरले

BJP vs Congress Clash: अमित साटम यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यानंतर मुंबईत राजकीय तणाव वाढला आहे. भाजप आणि काँग्रेस समर्थक आमनेसामने आल्यानंतर पोलिसांनी अनेक निदर्शकांना ताब्यात घेतलंय.
BJP vs Congress Clash:
Mumbai: Congress workers detained after heated protest outside Amit Satam’s office.saamtv
Published On

भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी साटम यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. काँग्रेस आमदार असलम शेख यांच्यावर केलेल्या अभद्र भाषेतील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली होती. साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस साटम यांच्या अंधेरी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली.

काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार असल्यानं पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यावेळी साटम यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमा झाले होते. दरम्यान पोलिसांनी संतप्त आंदोलकांना ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com