Prajakta Mali - Suresh Dhas: कुणाचंही मन दुखावलं असेल तर...; प्राजक्ता माळीबद्दलच्या वक्तव्यावर सुरेश धस यांची दिलगिरी

Suresh Dhas Apologizes Prajakta Mali : प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या आमदार सुरेश धस यांनी अखेर केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. प्राजक्ता माळीनं याबाबत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.
प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांची दिलगिरी
Prajakta Mali controversySaam tv
Published On

Suresh Dhas - Prajakta Mali Latest News Update : भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीची दिलगिरी व्यक्त केली. सुरेश धस यांनी नावाचा उल्लेख केल्याने प्राजक्ता माळीने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, मी चुकीचं काही बोललो नसल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं होतं. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर आज सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली.

प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांची दिलगिरी
Suresh Dhas : विषय संपला; प्राजक्ता माळी प्रकरणी महिला आयोग ॲक्शनमोडमध्ये, सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. सुरेश धस यांच्याकडून चारित्र्यहनन केल जात असल्याचं म्हणत प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांची दिलगिरी
Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची मोठी प्रतिक्रिया, केलं 'हे' महत्वाचं विधान | VIDEO

या भेटीत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर आज सोमवारी आमदार सुरेश धस यांनी व्हिडिओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस म्हणाले.

प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांची दिलगिरी
Suresh Dhas : बिनभाड्याच्या खोलीत बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; आमदार सुरेश धस बीडमध्ये कडाडले, रोख कुणाकडे? VIDEO

सुरेश धस काय म्हणाले?

'माझ्या विधानाचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांचा आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांची किंवा कोणत्याही स्त्रियांचे मन दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान, सुरेश धस यांनी बीड प्रकरणात नावाचा उल्लेख केल्याने प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. प्राजक्ताच्या तक्रारीनंतर महिला आयोग अॅक्शन मोडवर पाहायला मिळत होता. महिला आयोग कारवाईसाठी सज्ज झाला होता. यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर आज सोमवारी व्हिडिओ माध्यमातून प्राजक्ता माळीसहित दुखावलेल्या समस्त स्त्रियांची दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com